मातोश्री सीबीएससी अँकॅडमी म्हसरूळ या ठिकाणी गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात पार पडली. गांधी जयंती दिनानिमित्त आज शाळेमध्ये स्वच्छ भारत अभियान वृक्षारोपण, वन्य जीव सप्ताह या कार्यक्रमांचा आयोजन करण्यात आले. वृक्षारोपणासाठी बोरगड व कंनसरा चौक व इतर परिसर या ठिकाणांची निवड करण्यात आली शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून लोकांना स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. सदर कार्यक्रमाप्रसंगी माता पालक संघाच्या अध्यक्षा सौ साळवे मॅडम तसेच पालक संघाचे अध्यक्ष मधुकर कांबळे सर यांनी हजेरी लावली. आजच्या कार्यक्रमाप्रसंगी मातोश्री सीबीएससी अकॅडमीच्या मुख्याध्यापिका सौ शितल राठोड मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला .