दिनांक 6 ऑक्टोबर 2024 रोजी ग्राहक संरक्षण जनजागृती अभियानाद्वारे नाशिक जिल्हास्तरीय विद्यार्थी चित्रकला स्पर्धा चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील आयोजक पुढील प्रमाणे डॉ.साहेबराव निकम (प्रवक्ता तथा मार्गदर्शक) सचिन भाऊ पवार (संचालक हॉटेल सिटी स्पाइस म्हसरूळ) डॉक्टर अविनाश झोटिंग (राष्ट्रीय सचिव) सौ जानवी पाटील मॅडम (नाशिक जिल्हा मार्गदर्शक) सौ अर्चना झोटिंग मॅडम (राष्ट्रीय मार्गदर्शक) यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेमध्ये मातोश्री सीबीएससी अकॅडमी विद्यालयातील खूप विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला व यश संपादन केले. तसेच विद्यालयातील सायना मनोहर शिंदे (इयत्ता सातवी) या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक पटकावला. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ शितल राठोड मॅडम यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. आज विद्यालयामध्ये सर्व आयोजकांनी भेट देऊन गुणवंतांचा व मुख्याध्यापिका यांचा सत्कार केला व विद्यालयास प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.